Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, बांधले. पण तुम्हाला महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या जिंकलेला किल्ला माहितीये का?
तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला हा पहिला किल्ला होता.
महाराजांनी 1646 मध्ये तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आजही हा किल्ला अबाधित असून तुम्हा-आम्हाला साद घालतो.
किल्ल्याच्या प्रचंड आकारावरुन महाराजांनी त्याचे नाव 'प्रचंडगड' असे ठेवले होते.
तोरणा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला होता. पुढे औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्यावर त्याचे नाव 'फुतुलगैब' (दैवी विजय) असे ठेवले होते.
तोरणा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1,403 मीटर उंचीवर आहे. ट्रेकर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणारा किल्ले तोरणा आपले ऐतिहासिक महत्त्व आजही अबाधित राखून आहे.