Sameer Amunekar
सह्याद्रीच्या कुशीत १,४०३ मीटर उंचीवर दिमाखात उभा असलेला तोरणा किल्ला, जो त्याच्या प्रचंड आकारामुळे 'प्रचंडगड' या नावानेही ओळखला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकला होता. स्वराज्याच्या स्थापनेतील हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा विजय होता.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा तोरणा, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक आव्हानात्मक पण तितकाच सुखद अनुभव देणारा गड आहे.
किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य आणि पावसाळ्यात ढगांच्या सावलीत हरवलेला हा गड पर्यटकांना अक्षरशः स्वर्गसुखाचा अनुभव देतो.
गडावरील जुन्या वास्तू, भव्य तटबंदी आणि भग्नद्वारे आजही आपल्याला १७ व्या शतकातील पराक्रमी मराठा साम्राज्याच्या आठवणीत घेऊन जातात.
तोरणा किल्ल्याने अनेक ऐतिहासिक सत्तांतरं पाहिली आहेत. आदिलशाहीपासून ते मुघलांच्या ताब्यात जाण्यापर्यंत आणि पुन्हा मराठ्यांनी तो जिंकण्यापर्यंतचा थरारक इतिहास या गडाच्या दगडांमध्ये दडला आहे.
इतिहासप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी तोरणा किल्ला हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. येथील सूर्यास्त आणि निसर्गसौंदर्य पाहणे ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे.