गोमन्तक डिजिटल टीम
शतकांपासून कबूतराला शांतता आणि सौहार्दाचे प्रतिक म्हणून संबोधले जात आहे. पण का?
प्राचीन काळात, कबूतर युद्ध आणि राजकीय घडामोडींवेळी संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देणारे महत्त्वपूर्ण संदेश घेऊन जात असत.
ख्रिश्चन आणि ज्यू प्रतिकात्मकतेमध्ये कबूतर हे पवित्रतेचे, साधेपणाचे प्रतिक मानले जाते.
बायबलमध्ये एक कबुतर ऑलिव्हच्या फांदीसह नोहाच्या जहाजात परत आल्याची कथा आहे ज्याला महाप्रलयानंतरच्या शांततेचे प्रतिक मानले जाते.
कबूतरांच्या पांढऱ्या रंगाला शांतता, शुद्धता आणि निष्पापपणाशी जो़डले गेले.
या कारणांमुळे कबूतर प्रेम, निष्ठा आणि शांततेचे प्रतिनिधी मानले जाऊ लागले.
युद्धाला नको म्हणण्याचे आणि शांतता स्वीकारण्याचे प्रतिक म्हणून कबूतर आकाशात सोडण्याची पद्धत लोकप्रिय झाली.