Manish Jadhav
एकदा तरी समुद्री सफर केली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही क्रूझने समुद्री सफरीचा आनंद घेऊ शकता.
आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या क्रूझबद्दल जाणून घेणार आहोत.
हार्मोनी ऑफ द सीज ही जगातील सर्वात मोठी क्रूझ आहे. या क्रूझची लांबी 363 मीटर इतकी आहे.
या क्रूझची प्रवासी क्षमता तब्बल 5979 इतकी आहे. विशेष म्हणजे 2016 नंतर या क्रूझनं समुद्र प्रवास केलेला नाही. मात्र तरीही ही क्रूझ जगातील सर्वात 'आलिशान क्रूझ' आहे.
ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रूझ आहे. 2010 मध्ये या क्रूझचं जलावतरण झाले. यामधून 5400 प्रवासी करु शकतात. यामध्ये डान्स हॉल, चित्रपटगृह, आईस स्केटिंगसह फिटनेस रुम अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या या क्रूझची लांबी 362 मीटर इतकी आहे. या क्रूझमध्ये 16 विभाग आहेत. यामध्ये ऍक्वा थिएटर, रॉक क्लाईम्बिंग, फुटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्ट आणि स्विमिंग पूल यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.