Manish Jadhav
गोवा त्याच्या सर्वांग सुंदर अशा निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथली खाद्यसंस्कृतीही खूप प्रसिद्ध आहे.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर इथल्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतलाच पाहिजे. गोवन स्ट्रीट फूडची चव तुम्ही चाखलीच पाहिजे.
आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध अशा स्ट्रीट फूडविषयी जाणून घेणार आहोत. तुम्ही गोव्यात हा पदार्थ नक्की ट्राय केला पाहिजे.
पणजीतील 18 जून या गजबजलेल्या रस्त्यावरील एका चौकात ‘चायपानी’ नावाच्या छोटाशा स्टॉलवर ‘बोडाभजी’म्हणजेच म्हैसूरी गोड भजी मिळते.
नारळाच्या चटणीबरोबर थोडीशी गोडसर भजी भारी लागते. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी गरम गरम पोहे-उपमा देखील मिळतो. अगदी घाई गडबडीत असताना बसून खायला वेळ नसताना चायपानी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.