Akshata Chhatre
तुम्हाला घरच्या आवारात टांगती झाडं लावायची आहेत का? हो तर नेमकी कोणती झाडं लावावीत ज्यामुळे घराचं सौंदर्य वाढेल हे पाहुयात.
मोत्यांसारखी दिसणारी पाने लटकती आणि आकर्षक वाटतात. तसेच आधुनिक आणि बोहो स्टाईलसाठी हे रोप योग्य आहे.
रंगीबेरंगी आणि घंटेच्या आकारात असलेली ही फुलं बरीच आकर्षित करतात. बाल्कनी आणि खिडकीजवळ ठेवण्यासाठी हे रोप उत्तम, महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात भरघोस फुलते.
मऊ व पिसांसारखी हिरवी पानं असलेलं हे रोप दमट वातावरण आणि प्रकाशात वाढतात. हवेतील प्रदूषण कमी करणारे हे झाड आहे.
लटकती आणि आकर्षक गुलाबी-जांभळ्या फुलांची शोभा फुलपाखरं आणि सुतारपक्ष्यांना आकर्षित करते. या झाडाला जास्ती सावली असली तरीही चालतं आणि नियमित पाणी घातल्याने झाड आणखीन खुलतं.
लांबट, वळणदार पाने आणि लटकणारी छोटी रोपटी खूपच सुंदर दिसतात आणि महत्वाचं म्हणजे जास्ती वेळ काढून त्यांची काळजी घ्यावी लागत नाही.