Sameer Amunekar
इंग्लंड आणि भारत यांच्यातील लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. आशियाई विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता टॉप-५ मध्ये पोहोचला आहे.
एमएस धोनी हा आशियाई विकेटकीपर फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ९० कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये धोनीने १४४ डावांमध्ये ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या.
बांगलादेशचा मुशफिकुर रहीम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत, त्याने आशियाई यष्टीरक्षक म्हणून ५५ सामन्यांमध्ये ३७.०० च्या सरासरीने ३५१५ धावा केल्या आहेत.
या यादीत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशियाई यष्टिरक्षक म्हणून त्याने ४८ कसोटी सामन्यांच्या ८१ डावात ४०.४८ च्या सरासरीने ३११७ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा सरफराज अहमद या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आशियाई यष्टीरक्षक म्हणून त्याने ५४ कसोटी सामन्यांच्या ९५ डावात ३७.४१ च्या सरासरीने ३०३१ धावा केल्या आहेत.
भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत आशियाई विकेटकीपर म्हणून त्याने ४४ कसोटी सामन्यांमध्ये ४३.०४ च्या सरासरीने ३०१३ धावा केल्या आहेत.