Sameer Amunekar
कोकण हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश असून, येथील धबधबे हे प्रत्येक पावसाळ्यात पर्यटकांना खुणावणारे असतात.
कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा धबधबा म्हणजे राजापूर तालुक्यातील ‘सवतकडा धबधबा’.
सवतकडा धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या नैर्ऋत्य दिशेला वसलेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
धबधब्याच्या भोवतालचं परिसर हे जैवविविधतेने समृद्ध असून, हिवाळा आणि पावसाळा हे या भागाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानले जातात.
सवतकडा हा एक उंच आणि सरळ कोसळणारा धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे पाणी प्रचंड वेगात आणि उंचीवरून खाली कोसळते. येथील वातावरण थंड असतं.
पांढराशुभ्र फेसाळ पाण्याचा आवाज जंगलात घुमतो आणि एक विस्मयकारक अनुभव निर्माण करतो. धबधब्याच्या पायथ्याशी एक छोटं तलावासारखं पात्र तयार होतं, जेथे पर्यटक थोडा वेळ विसावू शकतात.