गोमन्तक डिजिटल टीम
हिवाळ्यात पर्यटनासाठी भारतातील ही सात ठिकाणे आहेत प्रसिद्ध
उदयपूरला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात येथे भव्य राजवाडे, तलाव पाहणे अविस्मरणीय अनुभव देतात.
हिवाळ्यात शिमल्यातील बर्फाच्छादित रस्ते, टॉय ट्रेन आणि माल रोडवरील मार्केट्स पर्यटकांना खुणावतात.
दार्जिलिंगच्या थंड हवामानात गरमागरम चहाचा आस्वाद घेत चहाच्या मळ्यांचे दृश्य, टायगर हिलवरील सूर्योदय पाहण्यात वेगळीच मजा आहे.
हिवाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे, नाताळच्या उत्साहासोबत लोकल फूड, कसिनो आणि नाईटलाईफचा आनंद लुटता येतो.
मनालीमध्ये हिवाळ्यात बर्फाचे खेळ आणि रोमँटिक वातावरण लोकांना आवडते.
रोहतांग पास, हिडिंबा मंदिर अशी ठिकाणे
आमेर किल्ला, हवा महल या खास वास्तूंसह जयपूर हे खरेदीसाठी उत्तम ठिकाण आहे.
औली हे भारतातील स्कीइंगचे मुख्य केंद्र आहे. येथे हिमालयाच्या पार्श्वभूमीत साहसी खेळांचा आनंद घेता येतो.