गोमन्तक डिजिटल टीम
डिसेंबर महिना जवळ आला की गोव्यात ख्रिसमसच्या तयारीचा उत्साह अनुभवायला मिळतो.
ख्रिसमससाठी गोव्यातील घरे, रस्ते सुंदर पद्धतीने सजलेले असतात.
ख्रिसमस कॅरोल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गोव्यातील लोक मनसोक्त सहभागी होतात. संगीत आणि नृत्याची मेजवानी असते.
सुंदर रोषणाई केलेल्या चर्चमध्ये प्रार्थनांसाठी लोक गोळा होतात.
पर्यटकांना गोव्याच्या रंगीबेरंगी माहौलचे खास आकर्षण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
बेबिंका, केकसारखे विशेष पदार्थ ख्रिसमससाठी बनतात.
समुद्रकिनारी ख्रिसमस सणाचा आनंद द्विगुणित होत असतो. शेकोट्या आणि गाण्यांनी वेगळीच रंगत येते.