Sameer Amunekar
अहमदाबाद येथील साईन्स सिटीमध्ये विज्ञानाचे विविध प्रयोग, इंटरअॅक्टिव्ह प्रदर्शनं, 3D थिएटर, रोबोटिक्स गॅलरी पाहायला मिळेल.
मुलांना ताडोबा अभयारण्यात जंगलातील वाघ, हत्ती, मृग यांचं नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करता येईल.
कुर्गमध्ये मुलांना निसर्गाशी नातं जोडता येतं. शेती कशी होते, कॉफी कशी तयार केली जाते, स्थानिक जीवनशैली कशी असते, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवता येतं.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी म्हणजे भारताच्या कलात्मक आणि धार्मिक वारशाचं जिवंत उदाहरण. या लेण्यांच्या भेटीतून मुलांना भारताचा प्राचीन इतिहास, बौद्ध धर्माची शिकवण, आणि शिल्प-कलाचं अप्रतिम सौंदर्य समजतं.
इमॅजिका पार्क हे भारतातील सर्वात मोठं थीम पार्क आहे. यामध्ये थ्रिल राईड्स, वॉटर पार्क, आणि स्नो पार्क अशा विविध आकर्षणांची रेलचेल आहे. पार्कमधील साहसी खेळ मुलांना आत्मविश्वास आणि संघटनात्मक कौशल्य शिकवतात.
गोवा शांत व आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात पॅरा ग्लायडिंग, जल क्रीडा, वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायविंग यांसारख्या साहसी क्रियांमधून मुलांना धाडस आणि आत्मविश्वास मिळतो.