Sameer Amunekar
रोज किमान 30 मिनिटं जलद चालणं हृदयासाठी उत्तम असतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
सायकलिंग करताना संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो आणि हृदयाचे कार्य अधिक सक्षमपणे होतं. हे वजन कमी करण्यासही मदत करतं.
आठवड्यातून काही वेळ धावल्याने हृदयाचे स्नायू बळकट होतात, कोलेस्टेरॉल कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका घटतो.
पोहणे हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि शरीर तणावमुक्त राहतं.
योगासनं आणि श्वसनाचे व्यायाम हृदयासाठी लाभदायक असतात. ते मन शांत ठेवतात, स्ट्रेस कमी करतात आणि रक्तदाब संतुलित ठेवतात.
संगीताच्या तालावर व्यायाम करताना हृदयाची धडधड योग्य पातळीवर येते, फिटनेस वाढतो आणि मजाही येते.