Sameer Amunekar
सतत एका बाजूला दुखणं, उलट्या होणं, प्रकाश किंवा आवाज सहन न होणं ही मायग्रेनची लक्षणं असू शकतात. यावर वेळेत उपचार न केल्यास त्रास अधिक वाढू शकतो.
दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, झोपेचा अभाव आणि सतत चिंता यामुळे डोकं दुखण्याचा त्रास वाढतो. यावर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
नाकाजवळील सायनस मध्ये इन्फेक्शन झाल्यास कपाळावर किंवा डोक्याच्या पुढच्या भागात डोकेदुखी होऊ शकते. ही डोकेदुखी सहसा सकाळी अधिक तीव्र असते.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डोकं दुखू शकतं. विशेषतः उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर शरीर हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे.
डोळ्यांची नंबर वाढलेला असेल, किंवा सतत मोबाईल/लॅपटॉप वापरामुळे डोळ्यांवर ताण आला असेल, तरी डोकं दुखू शकतं. डोळ्यांची तपासणी करून चष्मा वापरणं आवश्यक ठरू शकतं.
कधी कधी सततचं डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव किंवा अन्य न्यूरोलॉजिकल समस्येचं लक्षण असू शकतं. त्यामुळे वेळेत डॉक्टरी सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.