Solo Trip Destinations: सोलो ट्रॅव्हलर्ससाठी 'ही' 5 ठिकाणं ठरतायत फेव्हरेट डेस्टिनेशन्स!

Sameer Amunekar

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी सोलो ट्रॅव्हलर्ससाठी सुरक्षित, सुलभ आणि अनुभवांनी भरलेली आहेत. खाली 'सोलो ट्रॅव्हलर्ससाठी फेव्हरेट' ठरत असलेल्या 5 खास डेस्टिनेशन्सची माहिती दिली.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak

ऋषिकेश, उत्तराखंड

ऋषिकेश हे गंगेच्या तीरावर वसलेलं, निसर्गरम्य डोंगररांगांनी वेढलेलं एक आध्यात्मिक शहर आहे. योगाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आता सोलो ट्रॅव्हलर्समध्येही अत्यंत लोकप्रिय ठरतं आहे.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak

हंपी, कर्नाटक

हंपी हे यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळ असून प्राचीन विजयनगर साम्राज्याची भव्यता आजही येथे अनुभवता येते. भक्कम दगडांतील सुंदर शिल्पकला, विस्तीर्ण भग्नावशेष आणि संथ वाहणारी तुंगभद्रा नदी हे या ठिकाणाचे खास आकर्षण आहे.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak

गोवा

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी नाईटलाइफ, समुद्रकिनारे आणि मस्त मजा. पण सोलो ट्रॅव्हलर्ससाठी गोवा म्हणजे फक्त पार्टी नव्हे. इथे आहे निसर्ग, संस्कृती, शांततेचं आणि स्वातंत्र्याचं एक सुंदर मिश्रण.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak

मेक्लोडगंज, हिमाचल

धर्मशाळेजवळ वसलेलं मेक्लोडगंज हे हिमाचलचं एक छोटंसं पण मनाला भिडणारं ठिकाण आहे. दलाई लामा यांचे निवासस्थान आणि तिबेटी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव यामुळे हे ठिकाण आध्यात्मिकतेचा अनुभव देतं.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak

पुडुचेरी

पुडुचेरी म्हणजे एकदम वेगळा अनुभव. भारतात असूनही परदेशी वाटावं असं एक शहर! फ्रेंच कॉलोनियल शैलीतील रस्ते, रंगीबेरंगी इमारती, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ध्यानधारणेचं शांत वातावरण यामुळे सोलो ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास ठरतं.

Solo Trip Destinations | Dainik Gomantak
Hair Fall Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा