Sameer Amunekar
भारत हा निसर्गसंपन्न देश आहे आणि त्याच्या विविध भौगोलिक रचनेमुळे येथे अनेक भव्य आणि अप्रतिम धबधबे आढळतात. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच सुंदर आणि जिवंत भासतात.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे परिसरात वसलेला हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. याची उंची सुमारे 455 मीटर (1493 फूट) आहे. वराही नदीवर हा धबधबा असून पावसाळ्यात याचा जलप्रवाह अत्यंत प्रचंड असतो.
ओडिशाच्या सिमिलिपाल नॅशनल पार्कमध्ये असलेला बरेहिपाणी धबधबा सुमारे 399 मीटर (1309 फूट) उंच आहे. दोन टप्प्यांमध्ये कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींना खूपच भुरळ घालतो.
चेरापुंजीजवळील नोहकालीकाई धबधबा भारतातील सर्वात उंच सिंगल ड्रॉप धबधबा आहे. याची उंची सुमारे 340 मीटर (1115 फूट) आहे. या धबधब्याच्या पार्श्वभूमीला एक भावनिक लोककथा देखील आहे, जी या स्थळाला अधिक वेगळेपण देते.
मेघालयमध्ये वसलेला हा धबधबा सुमारे 315 मीटर (1033 फूट) उंच असून, सात वेगवेगळ्या प्रवाहांमुळे याला “सात बहिणी धबधबा” असे म्हणतात. ढगांनी वेढलेला परिसर आणि पावसाळ्यातील भरघोस प्रवाह हे याचे वैशिष्ट्य.
गोव्यातील दूधसागर धबधबा सुमारे 310 मीटर (1017 फूट) उंच असून त्याचे पाणी दूधासारखे दिसते. हा धबधबा विशेषतः ट्रेनमधून दिसणाऱ्या नजाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे आणि गोव्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ मानले जाते.