Sameer Amunekar
भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी निसर्गाच्या कुशीत लपलेली आहेत आणि जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच वाटतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्वर्गसमान ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे एकदातरी तुम्ही जरूर जावं!
हिमालयाच्या कुशीत वसलेलं कश्मीर हे ठिकाण म्हणजे निसर्गाची भेट. डल लेकवरील शिकाऱ्यांची सफर, गुलमर्गमधील बर्फाच्छादित डोंगर, आणि श्रीनगरची बागा यामुळे हे ठिकाण स्वर्गासारखं वाटतं.
‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखलं जाणारं केरळ, त्याचे बॅकवॉटर्स, मुनारची चहा बागा आणि आयुर्वेदिक स्पा यासाठी प्रसिद्ध आहे. शांततेच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.
जगापासून अलिप्त असलेली, पण अत्यंत मोहक अशी स्पीती व्हॅली म्हणजे एक अद्वितीय ठिकाण. निळसर आकाश, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि तिबेटी संस्कृतीचं मिश्रण हेच तिचं खास वैशिष्ट्य आहे.
‘मेघालय’ म्हणजेच ‘ढगांचे घर’. चेरापुंजी आणि मावसिनराम यासारखी अतिवृष्टीची ठिकाणं, जगप्रसिद्ध "लिव्हिंग रूट ब्रिजेस" आणि निळसर तळ्यांमुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींचं हक्काचं ठिकाण आहे.
भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक, गोवा हे नुसतंच समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध नाही, तर तिथली लाईव्ह म्युझिक, नाईटलाईफ, वॉटर स्पोर्ट्स, पोर्तुगीज वास्तुकला आणि शांत आंतरिक गावं यामुळेही ते खास आहे.