Akshata Chhatre
लग्न ही एक सुंदर भावना असली तरी, त्यानंतरचं आयुष्य काही वेळा कठीण ठरू शकतं. पहिलं वर्ष म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा आणि सामंजस्याने जगण्याचा काळ असतो.
लग्नानंतर महिलांना अनेक भूमिकांमध्ये सामावून घ्यावं लागतं; पत्नी, सून, वहिनी. यामुळे स्वतःची ओळख हरवत असल्यासारखं वाटू शकतं.
दिवसभराच्या कामानंतर एकांत वेळ हवा असतो, पण जबाबदाऱ्या वाढल्यावर स्वतःसाठी वेळ मिळणे अवघड होतं, आणि त्यामुळे तणाव वाढतो.
दोन व्यक्तींचा मिळून संसार करताना खर्च आणि बचतीचं नियोजन करावं लागतं. यामध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे.
प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. संवादात अडथळे आले तर गैरसमज निर्माण होतात आणि नातं ताणातणावात सापडतं.
लग्नानंतर केवळ जोडीदाराशीच नव्हे, तर संपूर्ण नवीन कुटुंबाशी नातं तयार करावं लागतं जे सुरुवातीला कठीण जाऊ शकतं.