गोमन्तक डिजिटल टीम
ख्रिसमस सणाची तयारी आता सर्वत्र जोरात सुरु आहे.
भारतातील या पाच ठिकाणी ख्रिसमस सणाचा आनंद अनुभवण्यासारखा असतो.
गोवा हा ख्रिसमससाठी सर्वांत प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या रंगीबेरंगी लाईट्स, सॅंटाक्लॉजच्या परेड्स खास असतात.
कोचीतील ख्रिसमस सण सांस्कृतिक रंगांनी भरलेला असतो. येथे आयोजित होणाऱ्या 'कोची कॅरोल्स', ख्रिसमस बाजार आणि पारंपरिक मल्याळी जेवण यामुळे हा सण वेगळा बनतो.
मेघालयातील शिलॉंगमध्ये ख्रिसमस अत्यंत उत्साहात साजरा होतो. येथे संगीत महोत्सव, लोकनृत्य आणि झगमगत्या लाईट्सने संपूर्ण शहर सजवले जाते.
पुडुचेरीत रोषणाईने सजलेल्या चर्च, समुद्रकिनारी होणाऱ्या प्रार्थना आणि मार्केट्स पर्यटकांना आकर्षित करतात.
मणिपूरमध्ये ख्रिसमस मोठ्या आनंदाने आणि शांततेत साजरा केला जातो. पारंपरिक कार्यक्रम, प्रार्थनासभा आणि निसर्गाच्या सान्निध्यात हा सण साजरा करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.