Pramod Yadav
भारतीय लोकांनी 2023 मध्ये गोवा, व्हिएतनाम, बालीसह विविध पर्यटक ठिकाणांची गुगलवरुन माहिती घेतली.
2023 मध्ये व्हिएतनाम सर्वाधिक सर्च करण्यात आलेले ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. व्हिएतनामचे ऐतिहासिक महत्व, संस्कृती आणि निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत असतो.
भारतीय लोकांनी सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन ठिकाणात गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोव्यातील बीच, निसर्गरम्य ठिकाणे आणि नाईटलाईफ मुख्य आकर्षण आहेत.
देवभूमी म्हणून ओळख असलेल्या बालीने सर्चमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.
2023 मध्ये पर्यटन ठिकाणांच्या सर्चमध्ये श्रीलंका चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या दक्षिण टोकावरील श्रीलंका जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे.
थायलंड सर्वाधिक सर्च पर्यटनस्थळांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. थायलंडमधील समुद्रकिनारे, बेट आणि घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करतात.
याशिवाय काश्मीर, कुर्ग, आंदमान आणि निकोबार, इटली, स्वित्झर्लंड या पर्यटनस्थळांबाबत देखील शोध गुगलवर घेण्यात आला.