Sameer Amunekar
मनाली हे हनिमूनसाठी उत्तम ठिकाण आहे, विशेषतः मार्चमध्ये कारण तिथे अजूनही थोडी बर्फाची मजा अनुभवता येते आणि हवामान आल्हाददायक असते.
तुम्हाला समुद्रकिनाऱ्यांवरील शांतता आणि साहसी अनुभव दोन्ही हवे असतील, तर अंदमान-निकोबार हा तुमच्या हनिमूनसाठी एक स्वप्नवत पर्याय आहे. मार्चमध्ये इथलं हवामान आल्हाददायक असतं, ना जास्त गरम, ना जास्त थंड.
हनिमूनला एक शाही टच द्यायचा असेल, तर उदयपूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. याला "राजस्थानचं व्हेनिस" आणि "लेक सिटी" म्हणून ओळखलं जातं. सुंदर लेकसाइड व्ह्यू, आलिशान महाल, आणि ऐतिहासिक वैभव यामुळे उदयपूर हनिमूनसाठी परफेक्ट ठिकाण आहे.
हनिमूनला जर निसर्गाच्या सान्निध्यात एक रोमँटिक आणि शांत टच द्यायचा असेल, तर मेघालय हा सर्वोत्तम पर्याय आहे! हिरव्यागार टेकड्या, धुक्याची चादर, वाहणारे धबधबे आणि स्वच्छ नद्या यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी कपल्ससाठी परफेक्ट आहे.
गोवा हा हनिमून कपल्ससाठी भारतातील सर्वात रोमँटिक आणि उत्साही डेस्टिनेशन आहे! सुंदर समुद्रकिनारे, रोमँटिक रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि जबरदस्त नाईटलाइफ यामुळे गोवा एक परफेक्ट हनिमून स्पॉट बनतो.
मार्च महिना हनिमूनसाठी उत्तम मानला जातो, कारण हवामान उष्णतेच्या तीव्रतेशिवाय आल्हाददायक असते. भारतात आणि परदेशात अशा काही रोमँटिक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संस्मरणीय वेळ घालवू शकता.