Manish Jadhav
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. याचा फेस पॅक लावल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि त्वचा टवटवीत दिसते.
उन्हामुळे काळी पडलेली त्वचा (Suntan) साफ करण्यासाठी टोमॅटो अत्यंत प्रभावी आहे. यातील 'लायकोपीन' त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये नैसर्गिक 'ॲस्ट्रिंजंट' गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतात आणि मुरुमांची समस्या कमी करतात.
चेहऱ्यावरील मोठी छिद्रे कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस उपयुक्त ठरतो. यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.
टोमॅटोमधील एन्झाइम्स त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात. यामुळे चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो.
टोमॅटोमधील अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वाढत्या वयाची चिन्हे लवकर दिसत नाहीत.
चेहऱ्यावरील काळे डाग किंवा पिंपल्सचे वण घालवण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यास लवकर फरक पडतो.
टोमॅटोचा रस त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तर संतुलित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.