Manish Jadhav
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कमी गर्दीचे, शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले हिल स्टेशन शोधत असाल, तर तुम्हाला काही नवीन पर्यायांबद्दल नक्कीच माहिती असायला हवी.
पश्चिम बंगालमध्ये वसलेले दार्जिलिंग हे सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. एप्रिल-मे मध्ये भेट देण्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. हिरव्यागार चहाच्या बागांसाठी दार्जिलिंग प्रसिद्ध आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात भेट देण्यासाठी तामिळनाडूतील ऊटी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण कॉफी आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला तुमचा प्रवास रोमांचक बनवायचा असेल तर तुम्ही लेह लडाखला भेट देण्याची योजना नक्कीच करावी.
काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. इथे गेल्याने तुमचा सर्व थकवा निघून जाईल. तुमचे शरीर आणि मन उत्साहाने भरलेले असेल.