Manish Jadhav
टॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अभिनयाबरोबरच नो मेकअप लूक पॉलिसीसाठीही ओळखली जाते.
साई पल्लवी ही एक अशी अभिनेत्री आहे जी ग्लॅमरस कपड्यांपेक्षा साध्या कपड्यांमध्येच जास्त उठून दिसते.
तिच्या कपड्यांच्या निवडीमध्ये साधेपणा, सोज्वळपणा आहे. आणि तोच तर तिच्या चाहत्यांना सगळ्यात जास्त भावून जातो.
चेहऱ्यावर हसू आणि ग्लोइंग चेहरा पाहून कोणीही साईच्या प्रेमात पडेल.
साई मेकअपशिवाय पूर्णपणे नैसर्गिक लूकमध्ये छान स्मितहास्य करताना चाहत्यांना खूप भावते.
साऊथच्या या सौंदर्यवतीचा साडीतील लूक चाहत्यांच्या मनमंदिरी हळवी जागा करतो.
साईचा साधपेणा चाहत्यांना भावतो. ती मेकअपशिवायही खूप सुंदर दिसते.
साई एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना मोहिनी घालतात.