Bhajanlal Sharma: गोष्ट फर्स्ट टर्म आमदाराच्या मुख्यमंत्रीपदाची

Ashutosh Masgaunde

फस्ट टर्म आमदार

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले भजनलाल शर्मा पहिल्यांदाच सांगानेरमधून निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

RSS शी जवळीक

भजनलाल शर्मा हे सामान्य कुटुंब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून येतात. ते दीर्घकाळ संघाशी निगडीत आहेत.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

मूळ भरतपूर

भजनलाल शर्मा हे ५५ वर्षांचे असून, ते मूळचे भरतपूरचे आहेत. मात्र, पक्षाने त्यांना प्रथमच जयपूर जिल्ह्यातील संगनेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. जिथून ते जिंकून आमदार झाले.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

दहा वर्षांपासून प्रदेश महामंत्री

भजन लाल शर्मा हे दहा वर्षांपासून भाजपचे प्रदेश महामंत्री आहेत.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

34 वर्षांपासून राजकारणात

भजनलाल शर्मा 34 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले आणि राजकारणात त्यांचा प्रवेश झाला.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

पक्षाने तिकीट नाकारले

2003 मध्ये त्यांनी भरतपूरच्या नबाई मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2018 मध्ये शर्मा यांनी भाजपकडून तिकीट मागितले होते, परंतु पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

तुरुंगातवास

भजनलाल शर्मा 1990 मध्ये अभाविपच्या काश्मीर मोर्चातही सक्रिय होते. सुमारे 100 कार्यकर्त्यांसह त्यांनी उधमपूरकडे कूच केले आणि नंतर त्यांना अटक झाली.

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X

Google Trends: 2023 मध्ये नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केल्या 'या' बातम्या

Top Searched News On Google 2023 | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...