Ashutosh Masgaunde
खुशवंत सिंग हे भारतातील सर्वकालीन महान भारतीय लेखक आणि पत्रकार होते. 2 फेब्रुवारी 1915 मध्ये पाकिस्तानातील हदली येथे त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांची 110वी जयंती आहे.
20 मार्च 2014 रोजी वयाच्या 99 व्या वर्षी खुशवंत सिंह यांचे दिल्लीत निधन झाले. ते भारतातील सर्वोत्तम इतिहासकार आणि कादंबरीकारांपैकी एक होते.
आपल्या लेखनाबरोबरच खुशवंत सिंह राजकीय भाष्यकार, स्तंभलेखक आणि असामान्य निरीक्षक म्हणूनही आणि सामाजिक टीकाकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
खुशवंत सिंह यांनी प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लेखन केले. त्यांची प्रमुख पुस्तके ट्रेन टू पाकिस्तान, ज्याला 1954 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रशंसा आणि ग्रूव्ह प्रेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खुशवंत सिंह यांनी वयाच्या 98 व्या वर्षी, त्यांचे शेवटचे पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव 'द गुड, द बॅड अँड द रिडिकुलस' असे होते. आहेत.
1974 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1984 मध्ये, सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याच्या प्रवेशास आणि मोहीम राबविल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा सन्मान परत केला.
हिंदुस्तान टाईम्समध्ये शनिवारी प्रकाशित होणारा त्यांचा ""With Malice towards One and All" हा स्तंभ आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय स्तंभांपैकी एक आहे.