गोमन्तक डिजिटल टीम
वाढत्या लोकसंख्येनुसार आणि जंगलतोडीसोबत मानव प्राणी संघर्ष धोक्याच्या पायरीवर आलेला आहे.
दक्षिणेकडे खासकरुन केरळसारख्या राज्यात हत्ती मनुष्य संघर्ष वाढत आहे.
भारतीय वन सेवेतील एका अधिकाऱ्याने हत्ती-मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ॲप विकसित केले आहे.
हे एआय’ आधारित ॲप हत्तींचा माग घेऊन नागरिकांना सावध करते.
'एलिफंट ट्रॅकिंग ॲंड अलर्ट' या ॲपची निर्मिती वन व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि वन्यजीव शाखेच्या संयुक्त विद्यमाने झाली.
जंगलात पायी गस्त घालणाऱ्यांना हत्ती दिसल्यानंतर परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून फोन, एसएमएस तसेच व्हॉट्स ॲपवर संदेश पाठविला जाईल.
ज्यांचे मोबाईल क्रमांक व जीपीएस लोकेशन लिंक आहेत त्यांनाच ही माहिती जाते.