Parenting Tips: मुलांच्या वाढीवर होतोय मोबाईलचा वाईट परिणाम? जेवतानाची 'स्क्रीन हॅबिट' बदलण्यासाठी 'हा' फॉर्म्युला बेस्ट

Manish Jadhav

पालकांनी स्वतः आदर्श बना

मुले पालकांचे अनुकरण करतात. जर तुम्ही स्वतः जेवताना मोबाईल वापरत असाल, तर मुलेही तेच करणार. त्यामुळे आधी पालकांनी जेवताना फोन बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

Parenting Tips | Dainik Gomantak

'नो गॅजेट' झोन तयार करा

घरातील जेवणाचे टेबल किंवा जेवणाची जागा 'मोबाईल मुक्त' ठेवा. जेवताना टीव्ही, टॅब किंवा मोबाईल जवळही राहणार नाही याची शिस्त लावा.

Parenting Tips | Dainik Gomantak

जेवताना गप्पा मारा

जेवण ही संवादाची वेळ आहे. मुलांच्या शाळेत काय झाले, त्यांना काय आवडते यावर गप्पा मारा. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हा त्यांचे लक्ष मोबाईलकडे जात नाही.

Parenting Tips | Dainik Gomantak

मुलांची मदत

भाजी निवडणे, ताट वाढण्यात यामध्ये मुलांची मदत घ्या. स्वतः तयार केलेल्या अन्नाबद्दल त्यांना कुतूहल निर्माण होईल आणि ते मोबाईलशिवाय आनंदाने जेवतील.

Parenting Tips | Dainik Gomantak

जेवणाची वेळ निश्चित करा

जेवणाची एक ठराविक वेळ ठेवा. वेळेवर भूक लागली की मुले जेवणावर लक्ष केंद्रित करतात. भूक नसताना जेवायला बसवल्यास ते वेळ घालवण्यासाठी मोबाईलची मागणी करतात.

Parenting Tips | Dainik Gomantak

'डिजिटल डिटॉक्स' रिवॉर्ड

जेव्हा तुमचे मूल मोबाईलशिवाय जेवण पूर्ण करते, तेव्हा त्याचे कौतुक करा. "आज तू खूप शहाण्यासारखं जेवलास" असे म्हटल्याने मुलाला प्रोत्साहन मिळते.

Parenting Tips | Dainik Gomantak

अन्नाच्या चवीवर लक्ष केंद्रित करा

मुलांना अन्नाचा रंग, चव आणि सुवास याबद्दल सांगा. अन्नाचा आनंद घेऊन खाल्ल्याने मेंदूला तृप्ती मिळते, जी मोबाईल बघून जेवताना मिळत नाही.

Parenting Tips | Dainik Gomantak

हळूहळू बदल करा

ही सवय एका दिवसात सुटणार नाही. सुरुवातीला 10-15 मिनिटे मोबाईलशिवाय जेवण्याचा सराव करा आणि हळूहळू पूर्ण जेवण मोबाईलशिवाय करण्याची सवय लावा.

Parenting Tips | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा