Akshata Chhatre
आपल्या घराबाहेर तुळशीचं झाड असतंच. भलं मग मोठं तुळशी वृंदावन नसेल पण एक रोपटं नक्कीच असतं. पण सध्या गरमी एवढी वाढली आहे की हे रोपटं क्षणांत बावतं.
असं म्हणतात तुळशीच्या रोपट्याचे अनेक फायदे असतात. धार्मिक मान्यता आहेच पण त्यासोबतच वैद्यनिक दृष्ट्या सुद्धा तुळशीचे अनेक फायदे आहेत. मग आता या उकाड्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी कशी घ्याल?
आज आम्ही तुम्हाला असे काही टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या तुळशीच्या रोपट्याला उकाड्याचा त्रास होणार नाही.
उकाड्यात सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुळशीच्या मुळाशी कायम माती ओली ठेवायची आहे.
अनेकवेळा पाण्यामुळे माती घट्ट होते, मुळांना हालचाल करता येत नाही,अशावेळी पाणी देऊन काही फायदा नसतो. त्यामुळे वेळोवेळी माती हलकी करा, रोपट्याची कुंडी बदलून बघा.
या उन्हाळ्याच्या दिवसांत शक्य असल्यास रोपटं घरात किंवा सावलीत ठेवा. सूर्यकिरणांमुळे झाडाची पानं पिवळी पडायला सुरुवात होते. रोपट्याची काही पानं मेलेली असतील तर ती काढा, यामुळे चांगल्या पानांना आवश्यक पोषण मिळेल आणि रोपट्याला वाढायला मदत मिळेल.