Sameer Amunekar
पालकांना लग्नाबद्दल सांगण्यासाठी शांत आणि आनंदी वातावरणाची निवड करा. घरातील सदस्यांचा मूड चांगला असताना या विषयावर चर्चा करणे फायदेशीर ठरते.
पालकांशी बोलताना तुमच्या भूमिकेत स्पष्टता आणि आत्मविश्वास हवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराबाबत का गंभीर आहात आणि भविष्यात तुम्ही आनंदी कसे राहाल, हे त्यांना विश्वासाने पटवून द्या.
पालकांना तुमच्या पार्टनरबद्दल माहिती द्या. शक्य असल्यास, त्यांना भेटण्याची संधी निर्माण करा. जोडीदाराचे संस्कार, कामातील प्रगती आणि कुटुंबाप्रती असलेला आदर पालकांसमोर स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे.
चर्चेदरम्यान केवळ स्वतःचेच मत मांडू नका, तर पालकांच्या शंका किंवा भीतीही शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्या चिंतेचा आदर करा आणि त्यांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे द्या.
अशा विषयावर निर्णय घेण्यासाठी पालकांना वेळ द्या. ते लगेच सहमत होतीलच असे नाही, त्यामुळे घाई करण्याऐवजी त्यांना विषयाचे गांभीर्य समजून घेण्यासाठी थोडा वेळ आणि स्पेस द्या.