Sameer Amunekar
धुक्याने वेढलेले डोंगर, कोसळणारे धबधबे आणि स्ट्रॉबेरीची बाग! महाबळेश्वरचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. येथील 'वेण्णा लेक' आणि 'आर्थर सीट' पॉईंट नक्की अनुभवा.
हिरवेगार चहाचे मळे आणि धुक्याची चादर ओढलेली पहाडं पाहण्यासाठी मुन्नारला पर्याय नाही. पावसाळ्यातील येथील शांतता आणि निसर्गसौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल.
मुंबई-पुण्याजवळ असलेले हे ठिकाण पावसाळ्यासाठी सर्वोत्तम आहे. 'भुशी डॅम' आणि 'टायगर पॉईंट'वरून दिसणारे धबधबे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.
जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक! येथील 'नोहकलिकाई धबधबा' आणि जिवंत मुळांचे पूल (Living Root Bridges) पावसाळ्यात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य दिसतात.
'भारताचे स्कॉटलंड' म्हणून ओळखले जाणारे कुर्ग पावसाळ्यात पूर्णपणे हिरवाईने नटलेले असते. कॉफीचे मळे, अभयारण्ये आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त असलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यात धुक्यात हरवलेले असते. येथील 'पॅनोरमा पॉईंट'वरून दिसणारा नजारा अविस्मरणीय असतो.
पावसाळ्यात उदयपुरमधील तलाव भरून वाहतात, ज्यामुळे या 'सिटी ऑफ लेक्स'चे सौंदर्य दुपटीने वाढते. ऐतिहासिक वास्तू आणि पावसाळी हवामानाचा मिलाफ येथे अनुभवायला मिळतो.