दैनिक गोमन्तक डिजिटल
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, तिकीट्स आणि हॉटेल बुकिंगचे पेपर्स एका सुरक्षित झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. ऑनलाईन पेमेंटवर पूर्णपणे अवलंबून न राहता काही रोकड (कॅश) सोबत नक्की ठेवा.
प्रवासात फोटो काढणे, मॅप वापरणे यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे बॅकअपसाठी चार्ज केलेली पॉवर बँक, युनिव्हर्सल चार्जर आणि हेडफोन्स आवर्जून सोबत घ्या.
प्रवासात हवामान बदलल्यास ताप, सर्दी, पोटदुखी किंवा उलटी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक औषधे, बँड-एड आणि पेनकिलरची एक छोटी मेडिकल किट सोबत ठेवा.
उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चांगल्या SPF चे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लिप बाम आणि ओले टिश्यूपेपर्स (Wet Wipes) सोबत ठेवायला विसरू नका.
हॉटेलमध्ये वस्तू असल्या तरी स्वतःचे टूथब्रश, पेस्ट, छोटा साबण, सॅनिटायझर आणि एक छोटा टॉवेल नेहमी सोबत ठेवावा, जो प्रवासात कधीही कामाला येऊ शकतो.
प्रवासात हायड्रेटेड राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवल्याने प्लॅस्टिकचा कचरा कमी होतो आणि तुम्हाला स्वच्छ पाणीही मिळते.
जाणार असलेल्या ठिकाणच्या हवामानानुसार कपडे निवडा. एक अतिरिक्त जोड कपडे आणि चालण्यासाठी अत्यंत आरामदायी असे बूट किंवा सँडल्स सोबत ठेवा.