Hair Care: केमिकल प्रॉडक्ट्सला म्हणा बाय-बाय! उन्हाळ्यात केसांत होणारा घाम, खाज आणि कोंड्याचा समूळ नायनाट करेल 'हा' एकच नैसर्गिक उपाय!

दैनिक गोमन्तक डिजिटल

उन्हाळ्यात केसांची कोंड्यातून सुटका!

उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे टाळूवर (Scalp) कोंडा आणि खाज येण्याची समस्या वाढते. यावर कडुलिंबाचे पाणी रामबाण उपाय ठरते.

Hair Care | Dainik Gomantak

कडुलिंबाचे पाणी का आहे फायदेशीर?

कडुलिंबामध्ये शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन मुळापासून नष्ट करतात.

Hair Care | Dainik Gomantak

खाज आणि घामाच्या दुर्गंधीपासून आराम

उन्हाळ्यातील घामामुळे केसांना येणारी दुर्गंधी आणि सतत होणारी खाज कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास झटकन दूर होते.

Hair Care | Dainik Gomantak

असे तयार करा 'मॅजिकल वॉटर'

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाका. पाणी अर्धे होईपर्यंत चांगले उकळून घ्या आणि नंतर ते थंड होऊ द्या.

Hair Care | Dainik Gomantak

वापरण्याची सोपी पद्धत

नेहमीप्रमाणे शॅम्पूने केस धुवून झाल्यानंतर, सगळ्यात शेवटी हे कडुलिंबाचे पाणी केसांना आणि टाळूला लावून ५ मिनिटे मसाज करा.

Hair Care | Dainik Gomantak

साध्या पाण्याने केस स्वच्छ करा

कडुलिंबाचे पाणी लावल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी केस साध्या कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Hair Care | Dainik Gomantak

आठवड्यातून दोनदा वापरा आणि फरक पहा!

सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या पाण्याने केस धुवा. तुमचे केस मऊ, चमकदार आणि समस्यामुक्त होतील!

Hair Care | Dainik Gomantak

शत्रूच्या अथांग फौजेला नमवणारा शिवरायांचा बुलंद बाणा!

Chhatrapati Shivaji Maharaj | D ainik Gomantak
आणखी बघा