Sameer Amunekar
बऱ्याचदा असं होतं की, आपण आपल्या जोडीदाराचा आदर करत नाही. इतरांसमोर त्यांची थट्टा करतो. यामुळे जोडीदाराला राग येवू शकतो. मज्जा, मस्ती करताना आजुबाजूला कुणी आहेत याचा भान ठेवा आणि जोडीदाराचा आदर करा.
नवरा-बायकोच्या नात्याची गाठ काचेप्रमाणे नाजूक असते. या नात्याला जपावं लागतं आणि तेवढचं पारदर्शक देखील ठेवावं लागतं. यामुळे नात आणखी घट्ट होतं.
आपला संपूर्ण वेळ कुटुंबाल द्या. त्यांच्याशी गप्पा मारा, दोघेही सोबत मिळून स्वयंपाक करा. तसंच इतर कामात जोडीदाराची मदत करा. यामुळे नवरा बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण होतो.
आपल्या शब्दांमुळे आपला जोडीदार किती दुखावला याची आपल्याला कल्पना आपल्याला नसते. परिणामी नात्यात कटूता वाढायला लागते. म्हणून शक्य असल्यास राग आल्यावर दोघांनी एक मेकांशी बोलू नये. काही वेळ शांत बसावं.
नातं जास्त काळ चांगलं राहावं याकरिता विश्वास फारं महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवल्यास दोघांमध्ये दूरावा येवू शकतो.
पौष्टिक आहार घेतल्यास शरीरातील हॅपी हार्मोन्स अक्टिव्ह होतात. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे नात्यात देखील आनंद दरवळतो.
काही वेळा मतभेद किंवा समस्या येऊ शकतात, पण त्यावर शांतपणे विचार करा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नात्याला हानी पोहोचवू शकतात.