Sameer Amunekar
गोव्याच्या दक्षिण भागातील सान्गुएम तालुक्यात स्थित आहे. हे धरण गोव्याच्या प्रमुख जलस्रोतांपैकी एक आहे आणि राज्यातील शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, तसेच पर्यटनासाठी खूप महत्त्वाचे आहे. या धरणात बोटीतून प्रवास करणे फारच आनंददायी आहे.
गोव्यात फिरायला जाण्याचं प्लॅनिंग सुरु असेल तर चोरला घाटमध्ये नक्की फिरून या. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर वसलेला ‘चोरला घाट’ हे पश्चिम घाटातील विलोभनीय, मनमोहक असे दृश्य दाखवणारे एक हिल स्टेशन आहे.
गोव्याच्या दक्षिण भागात असलेले हे अभयारण्य निसर्गरम्य वातावरणात हरवण्यासाठी उत्तम आहे. जंगलातील ट्री हाऊसवरून वन्यजीवांचे निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव येथून घेता येतो.
दिवार बेट गोव्याच्या शांत आणि अप्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे बेट मंडोवी नदीच्या मध्यभागी वसलेले असून, त्याचा निसर्गरम्य सौंदर्य, पारंपरिक गोमंतकीय जीवनशैली, आणि सांस्कृतिक वारसा पर्यटकांना भुरळ घालतो.
नेत्रावली अभयारण्य हे गोव्याच्या दक्षिण भागात वसलेले एक सुंदर आणि जैवविविधतेने समृद्ध अभयारण्य आहे. हे पर्यावरणप्रेमी आणि साहसी प्रवाश्यांसाठी एक अनोखे ठिकाण आहे, कारण इथे गोव्याच्या नैसर्गिक वैभवाचा अनुभव घेता येतो.
अल्डोना हे गोव्याच्या उत्तर भागातील एक निसर्गरम्य आणि पारंपरिक गाव आहे. शांत आणि रमणीय वातावरण, ऐतिहासिक वारसा, आणि स्थानिक जीवनशैली यामुळे अल्डोना हे गोव्याचे खजिना मानले जाते.
फोंडा येथील शांतादुर्गा देवीचे मंदिर हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसले आहे. हे धार्मिक आणि शांत ठिकाण आहे.