Akshata Chhatre
बाथरूममध्ये किंवा कंगव्यावर दररोज केसांचा गुच्छ पाहून तुम्हाला चिंता होत असेल, तर तुम्ही एकटे नाही.
केवळ तेल लावणे हा केसांच्या समस्येवरचा पूर्ण उपाय नाही; केसांच्या आतून आणि बाहेरून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
केस प्रथिनांचे (Protein) बनलेले असतात, त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि इतर पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे. अंडी, दूध, पनीर, डाळी आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करा.
आजच्या धावपळीच्या जीवनात ताण एक सामान्य समस्या आहे, जो थेट केस गळण्याशी जोडलेला आहे.जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, जे केसांची वाढ थांबवतात.
केस धुण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. खूप गरम पाण्याने केस धुतल्यास त्यांची मुळं कमजोर होतात. नेहमी कोमट पाणी वापरा. केस धुतल्यानंतर टॉवेलने हलक्या हाताने पुसा.
हेअर स्ट्रेटनर, कर्लर आणि रासायनिक हेअर डाईचा जास्त वापर केल्यास केस रूक्ष आणि निर्जीव होतात. या टूल्समधून निघणारी उष्णता केसांची मुळं कमजोर करते, ज्यामुळे केस गळायला लागतात.
केसांच्या वाढीसाठीही झोप गरजेची आहे. झोपताना शरीर स्वतःची पुनर्बांधणी करते, ज्यामध्ये केसांच्या मुळांना पोषण मिळणे देखील समाविष्ट आहे. रोज रात्री ७-८ तास गाढ झोप घेतल्यास केस आणि संपूर्ण आरोग्य सुधारते.