Akshata Chhatre
बरेच लोक थकवा, पुरळ आणि श्वासोच्छ्वासच्या समस्यांसाठी आहार किंवा अपुऱ्या झोपेला दोष देतात, पण मूळ कारण आपली रोजची उशी असू शकते. ज्याप्रमाणे अन्न आणि औषधांना एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे उशीलाही असते.
वर्षानुवर्षे एकाच उशीचा वापर केल्याने त्यावर खालील गोष्टींचा थर जमा होतो. घामाचे कण, त्वचेतील तेल, डेड स्किन सेल्स, धूळ कण यामुळे बॅक्टेरियांची वाढ होते.
बॅक्टेरियांची वाढ झाल्याने खालील आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्वचेच्या समस्या जाई की चेहऱ्यावर पुरळ, खाज आणि ॲलर्जी.
डॉक्टरांच्या मते, तुमच्या उशीचा प्रकार तिचा टिकाऊपणा ठरवतो. पॉलिस्टर उशी ६ महिने ते २ वर्षे,फेदर उशी १ ते ३ वर्षे, बकव्हीट उशी ३ ते ५ वर्षे.
काही ठळक लक्षणे तुम्हाला उशी बदलण्याची वेळ आल्याचे सांगतात. उशीवर डाग पडले,ती आतून घट्ट झाली असेल किंवा ढासळलेली वाटत असेल, सकाळी उठल्यावर मान आखडत असेल.
उशीवर कव्हर वापरा आणि ते दर आठवड्याला धुवा. दर काही महिन्यांनी उशी उन्हात ठेवून हवा लागू द्या, यामुळे ओलावा आणि जंतू कमी होतात.
या छोट्या सवयींमुळे तुमचे झोपेचे वातावरण स्वच्छ राहील आणि सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटेल.