Manish Jadhav
प्रसिद्ध अमेरिकन टाइम मॅगझिनने नुकतीच 100 प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत भारतीय कंपन्यांचा बोलबाला पाहायला मिळाला.
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि टाटा समूहाने प्रसिद्ध अमेरिकन मॅगझिन टाइममध्ये स्थान मिळवले आहे.
टाइम मॅगझिनने 2024 या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, ही यादी 5 श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये लीडर्स, डिसप्टर्स, इनोव्हेटर्स, टायटन्स आणि पायोनियर्स यांचा समावेश आहे.
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स आणि टाटा समूहाला टायटन्स श्रेणीत स्थान मिळाले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पायोनियर श्रेणीसाठी निवड झाली आहे.
टाईम मॅगझिने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून समावेश केला आहे.
टाटा समूहाबाबत टाईममध्ये लिहिले आहे की, ‘’हा समूह भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. त्याचा पोर्टफोलिओ स्टील, सॉफ्टवेअर, घड्याळे, मीठ, धान्य, एअर कंडिशनर्स, फॅशन आणि हॉटेल्सपर्यंत विस्तारित आहे.