Tillari Dam: उत्तर गोव्याची तहान भागवणारे 'तिळारी' धरण

गोमन्तक डिजिटल टीम

संयुक्त प्रकल्प

तिळारी धरण महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त प्रकल्पातून तिळारी नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी दोन्ही राज्यांना वितरित केले जाते.

Tillari Dam

वापर

या धरणाचे पाणी गोव्यातील प्रामुख्याने डिचोली, पेडणे, बार्देश या तीन तालुक्यांना वापरले जाते. औद्योगिक वापरासाठीही याचा उपयोग केला जातो.

Tillari Dam

सिंचन क्षमता

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेजवळील या सिंचन प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 1862 हेक्टर आहे

Tillari Dam

15 अब्ज खर्च

मातीच्या या धरणाचे काम मे 2009 मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पाला एकूण 15 अब्ज रुपये खर्च आला.

Tillari Dam

तिळारी नदी

हे धरण ज्या नदीवरती आहे ती तिळारी नदी जैवविविधतेने समृद्ध नदी आहे. पाणमांजरे, विविध प्रजातीचे मासे यांचा तिथे अधिवास आहे.

Tillari Dam

तिलारी धबधबा

इथे आसपास पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. निसर्गाच्या कुशीत असणारा हा धबधबा पर्यटकांना खुणावत असतो.

Tillari Dam

स्वप्नवेल पॉईंट

अद्भुत असे हे ठिकाण धरणापासून अगदी जवळ आहे. उंचावरून कोसळणारे धबधबे, धुक्याने लपेटलेली दरी आणि नदीचे विस्तृत खोरे इथून पाहावयास मिळते.

Tillari Dam

धरणाचे दरवाजे

मुख्य धरण भरल्यानंतर त्याचे दरवाजे उघडले जातात. तेंव्हा बाहेर कोसळणारे पाणी बघणे धडकी भरवणारे असते.

Tillari Dam

माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात

Rice Farming
आणखी पाहा