गोमन्तक डिजिटल टीम
भारत हा असा कृषिप्रधान देश आहे ज्याला सुपीक मैदाने आणि बारमाही नद्यांचे वरदान लाभले आहे. भारतातील सुमारे तीन चतुर्थांश जमीन अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली जाते.
जगातील सर्वात जास्त भात उत्पादन आपल्या देशात होते. सुमारे ६५ टक्के भारतीयांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो.
गोव्यात विशेषत: ग्रामीण क्षेत्रामध्ये भातशेती चांगली होते. इथले हवामान आणि जमीनीचा पोत भातशेतीसाठी पूरक आहे. भात या राज्याचे प्रमुख पीक आहे.
गोव्यात भाताची लागवड पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही हंगामात केली जाते. सध्या मान्सून आगमनासोबत शेतकऱ्यांनी भात बियाणे पेरणी प्रक्रिया सुरू केली.
गोव्यात पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारची भातशेती पाहायला मिळते. लागवडीच्या तीन आठवड्यानंतर हिरवीगार रोपे शेतांमध्ये डोलू लागतात.
ही रोपे सोनेरी होऊ लागल्यावर कापणी केली जाते आणि धान्य मळणीसाठी तयार होते. कापणी हाताने किंवा आजकाल मशीनच्या मदतीने केली जाते.
यंदा गोवा राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील भातशेती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाहा गोव्यातील 'या' ५ जीवनदायिनी