गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याच्या म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
म्हादई अभयारण्यात आढळणारे वाघ कर्नाटक किंवा महाराष्ट्रातून येतात असे आतापर्यंत सांगण्यात येत होते.
म्हादई अभयारण्यात जन्माला आलेल्या वाघ व वाघिणीचा वावर सध्या या जंगलात आढळत आहे.
अहवालानुसार गोव्यात पाच वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे. २०२२ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र गणना झाली, त्यातून पाच वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते.
अंजुणे धरण व चोर्ला घाटात अनेकदा ट्रकचालकांना वाघ दिसलेला आहे.
एका भागात तर वाघीण तीन बछड्यांसह कॅमेऱ्यात टिपली गेली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गोवा सरकारला म्हादई अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे,