Tibetan Market|खर्च फक्त 500, बागाच्या तिबेटी बाजारात करा भरपूर खरेदी!

Akshata Chhatre

तिबेटी बाजार

बागाचा तिबेटी बाजार! पर्यटकांचं आवडतं ठिकाण. इथे मिळतात अनोख्या भेटवस्तू आणि सुंदर हस्तकला. पण फक्त ५०० मध्ये खरेदी शक्य आहे का? चला पाहूया!

tibetan market baga goa | Dainik Gomantak

पारंपरिक दागिन्यांची रेलचेल

इथे आहेत सुंदर ऑक्सिडाइज्ड दागिने; नाजूक हार, रंगीबेरंगी अंगठ्या आणि भरगच्च बांगड्या तुम्हाला १०० ते १५० मध्ये मिळतील.

tibetan market baga goa | Dainik Gomantak

आकर्षक हस्तकला बॅग्स

वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला बॅग्स; टोट बॅग्सपासून विणलेल्या बॅग्सपर्यंत, प्रत्येक बॅगची स्वतःची खास शैली आहे. १५० ते २०० मध्ये छान बॅग मिळू शकतात.

tibetan market baga goa | Dainik Gomantak

लाकडी कोरीव कलाकृती

लाकडी कोरीव कलाकृती म्हणजे कलाकारांची कमाल. धार्मिक मूर्ती आणि प्राण्यांच्या सुंदर कलाकृती १०० ते १५० मध्ये मिळू शकतात.

tibetan market baga goa | Dainik Gomantak

विंड चाइम

वाऱ्याच्या झुळुकेने वाजणारे विंड चाइम, कानाला सुखद आवाज देतात. हे १०० ते १५० मध्ये सुद्धा मिळू शकतात.

tibetan market baga goa | Dainik Gomantak

सुंदर ड्रीम कॅचर

मऊ पिसे, दोरे आणि कापडांनी बनलेले सुंदर ड्रीम कॅचर भिंतीवर टांगण्यासाठी एकदम परफेक्ट असतात. तुम्हाला इथे १०० ते १५० मध्ये लहान ड्रीम कॅचर मिळू शकतात.

tibetan market baga goa | Dainik Gomantak

तिबेटी बाजार

बागाचा तिबेटी बाजार म्हणजे खरेदीचा आनंद. इथे तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये खास भेटवस्तू आणि सुंदर हस्तकला. बागाच्या तिबेटी बाजाराला नक्की भेट द्या आणि तुमच्या बजेटमध्ये खरेदीचा आनंद लुटा!

tibetan market baga goa | Dainik Gomantak
Milk in Glass | Dainik Gomantak
दुधासोबत 'या' गोष्टी वर्ज