Akshata Chhatre
तुम्हाला माहितीये का काही चुकीच्या खाण्याच्या पद्धतींमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तुम्ही जर का काही अशा चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा, आणि या चुका टाळा.
असं म्हणतात दूध हे आरोग्यवर्धक आहे, मात्र हेच जर का चुकीच्या पद्धतीने पोटात गेलं तर त्यामुळे भरपूर त्रास सहन करावा लागू शकतो.
आयुर्वेदाप्रमाणे दुधासोबत काही गोष्टी खाण्यास वर्ज आहेत. आपल्याला अनेकवेळा या गोष्टी माहिती नसतात आणि याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो
चला तर मग जाणून घेऊया दुधासोबत नेमक्या कोणत्या गोष्टी खाल्या नाही पाहिजेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे दुधासोबत केळं खाऊ नका, यासोबतच आंबट गोष्टी दुधासोबत खाऊ नये. दूध पिल्यानंतर गूळ खाऊ नये असं म्हटलं गेलंय, याचा थेट परिणाम त्वचेवर होण्याची शक्यता असते.