गोमन्तक डिजिटल टीम
ऑक्टोबरचा महिना काही दिवसांवर आहे. तुम्ही जर का ऑक्टोबरमध्ये गोव्याला जाणार असाल तर गोव्याला भेट देण्याची आणखीन चांगली वेळ असूच नाही शकत.
पण गोव्याला जाऊन तेच समुद्र बघायचे नाहीत म्हणून Confused आहात? गोव्यात आणखीन अजून बऱ्याच जागा आहेत जिथे तुम्ही सुट्टीचा मनमानसोक्त आनंद लुटू शकता.
गोवा हा मुळातच निसर्गाचं सुंदर रूप आहे, रोजच्या धावपळीत आपल्याला ही शांतता अनुभवायला मिळत नाही. पक्षांच्या किलबिलाट ऐकायचा असेल तर डॉ. सलीम अली बर्ड सेंचुरी, करमाळीचं तळं किंवा खोतीगावला भेट देता येते.
डिचोली तालुक्यात मये नावाचं गाव आहे आणि इथे असलेलं तळं प्रचंड प्रसिद्ध आहे. तुम्हाला काही वॉटर ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर इथे बंजी जम्पिंगचा पर्याय उपलब्ध आहे.
खोतीगाव, बोंडला, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सेंचुरी या जागांवर जाऊन वन्यजीवांना पाहता येतं.
या सहलीत तुम्हाला गोव्याचा इतिहास सुद्धा समजू शकतो. यासाठी नौदलाच्या संग्रहालयाला किंवा गोव्याच्या संग्रहालयाला भेट द्या.
कितीही नाही म्हटलं तरीही गोवा हा समुद्रकिनाऱ्या शिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे शांतता हवी असेल तर शिकेरीला किंवा दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर नक्कीच जाऊन या.