Borim Small Waterfall: चला करुया बोरीच्या धबधब्याची सैर!

Manish Jadhav

गोवा पर्यटन

गोव्याला दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. खासकरुन पावसाळ्यात गोव्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. सध्या गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

Goa Tourism | Dainik Gomantak

गोव्यातील धबधबे

पावसाळ्यात दूधसागरसह गोव्यातील प्रसिद्ध धबधब्यांना तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. दूधसागर व्यतिरिक्त ताबंडी सुर्ला धबधबा, नेत्रावळी धबधबा, बोरीचा धबधबाही नक्की पाहिला पाहिजे. या वेबस्टोरीच्या माध्यमातून आपण सर्वात लहान असणाऱ्या बोरीच्या धबधब्याविषयी जाणून घेणार आहोत.

Amboli Waterfall | Dainik Gomantak

बोरीचा धबधबा

फोंड्यातील बोरी गावात हा धबधबा आहे. तुम्ही पावसाळ्यात गोव्यात येत असाल तर नक्की हा धबधबा पाहा. फोंड्यातून हा धबधबा अवघ्या 7 किमी अंतरावर तर राजधानी पणजीपासून 36 किमी अंतरावर आहे.

Borim Small Waterfall

पावसाळ्यातील नजारा

पावसाळ्यात स्थानिकांसह शेजारील राज्यातील पर्यटक मोठ्याप्रमाणावर या धबधब्याला भेट देतात. पावसाळ्यात इथलं निसर्स सौंदर्याचा नजारा तुम्हाला मोहिनी घालतो.

Borim Small Waterfall

छोटा ट्रेक

मुख्य रस्त्यापासून अवघ्या पाच मिनिटांचा छोटा ट्रेक तुम्हाला बोरीतील या धबधब्यावर घेऊन जातो.

Borim Small Waterfall

मोठी गर्दी

पावसाळ्यासह आठवड्याच्या शेवटी हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात.

Borim Small Waterfall

ट्वीन धबधब्याला भेट

जंगलातून 15 मिनिटांचा ट्रेक तुम्हाला बोरीतील धबधब्यापासून थेट ट्वीन धबधब्याकडे घेऊन जातो.

Borim Small Waterfall
Amboli Waterfall | Dainik Gomantak