Pramod Yadav
गोवा आणि महाराष्ट्रातील सीमेवर सर्वांना आकर्षित करणारा आंबोली धबधबा प्रवाहित झाला आहे.
सावंतवाडीतून गोव्यात खाली येताना हा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच खास आकर्षण राहिला आहे.
दाट धुक्याने दाटलेला परिसर आणि रिमझिम बरसणाऱ्या पावासामुळे घाट परिसर आणखीच मनमोहक दिसतो.
पावसाळ्यात गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यातील पर्यटक येथे हजेरी लावत असतात.
आंबोली धबधबा धोकादायक नसला तरी याठिकाणी सुरक्षात्मक उपाय म्हणून पोलिस तैनात असतात.
धबधबा परिसरात पावासासोबत गरम चहा, भजी, भाजलेले कणीस यासह विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतात.
आंबोली घाट परिसरात अनेक नयनरम्य ठिकाणांवर थांबून निसर्गाचा आस्वाद घेता येईल.