Akshay Nirmale
स्मिता राजमाने आणि सोमनाथ वाघमारे यांचा द आंबेडकर एज डिजिटल बुक मोबाईल हा प्रकल्प आहे.
दलित समुदायातील समकालीन सुप्रसिद्ध आणि राजकीय गीतकार, त्यांची गीते, त्यांचे परफॉर्मन्स याबाबतची माहिती येथे आहे.
सोमनाथ वाघमारे हे महाराष्ट्रातील पीएच.डी. स्कॉलर आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहेत. आय अॅम नॉट विच (२०१५) आणि द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव - अॅन अनएंडिंग जर्नी (२०१७) आणि चैत्यभूमी या फिल्म्स त्यांनी बनवल्या आहेत.
स्मिता उर्मिला राजमाने या आर्टिस्ट आणि परफॉर्मर आहेत. जाती-वर्ग-लिंग भेद, जातीय-धार्मिक हिंसाचार याविरोधात त्या परफॉर्म करतात. त्यांनी दादरी येथील शिव नाडर विद्यापीठातून एमएफए पदवी घेतली आहे.
द बुकमोबाईल या प्रोजेक्टमध्ये संत तुकाराम, संत चोखामेळा, वामनदादा कर्डक ते आदर्श शिंदे यांच्या पर्यंतच्या गीतांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भीम गीते गाणारे गायक, त्यांचे जीवनचरित्र आणि संगीत याबाबतची माहिती येथे आहे.
येथे ही भीमगीते किंवा जातीभेद विरोधी गाणी, तसेच याबाबतच्या तज्ज्ञांच्या मुलाखती थेट ऐकता येऊ शकतात. अनेक जण ते ऐकतही आहेत.