गोमन्तक डिजिटल टीम
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याणने मंदिरासाठी ३० कोटी रुपयांची मदत केली आहे.
हिंदी चित्रपटासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने गुप्त दान केले आहे. मात्र किती दान केले आहे, हे अक्षयने सांगितले नाही.
भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनीही राममंदिरासाठी गुप्तदान केले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त त्यांनी अयोध्येत नुकतेच रामायणाचे नाट्य सादरीकरण केले.
मंदिर उभारण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये ट्विटरवर दिले होती.
दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
‘चाणक्य’ मालिकेत भूमिका साकारणारे मनोज जोशी यांनीही गुप्तदान केले आहे.
दूरचित्रवाणी वाहिनीवर २००८ मध्ये प्रसारित झालेल्या ‘रामायण’ मालिकेत श्रीराम झालेला गुरमित चौधरी याने राममंदिरासाठी दान केल्याची माहिती त्याने जानेवारी २०२१मध्ये सोशल मीडियावर दिली होती.
अनुपम खेर यांनी मंदिराच्या बांधकाम परिसराची छायाचित्रे शेअर केली होती. मंदिर बांधणीसाठी त्यांनी विटांची भेट दिली असल्याचे सांगितले होते.