Manish Jadhav
प्रवासासाठी वैध पासपोर्ट आणि आवश्यक व्हिसा आवश्यक असतो. परदेश प्रवासाला निघण्यापूर्वी पासपोर्ट आणि व्हिसा सोबत आहे का याची खात्री करा.
विमा, हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकिटे, ओळखपत्र आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कॉफी सोबत ठेवा. डिजिटल कॉपीसुद्धा सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.
प्रवास करण्यापूर्वी संबंधित देशाचे चलन (विदेशी मुद्रा) उपलब्ध करुन घ्या. आंतरराष्ट्रीय डेबिट/क्रेडिट कार्ड कार्यरत आहेत का हे बँकेकडून तपासून घ्या. विदेशी चलनासाठी पुरेशा प्रमाणात कॅश ठेवा.
तुम्ही ज्या देशात जाणार आहात त्या देशातील नियम, कायदे आणि संस्कृतीबद्दल माहिती घ्या. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी वर्तन, पोशाख, आणि स्थानिक प्रथा समजून घ्या.
प्रवास आरोग्य विमा (Travel Insurance) घ्या. संबंधित देशातील आरोग्य नियम तपासा (उदा. लसीकरण आवश्यकता). स्थानिक आपत्कालीन नंबर (पोलीस, रुग्णालय) सेव्ह करा.
हॉटेल बुकिंग आधीच करा आणि ते सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करा. स्थानिक वाहतूक पर्याय जाणून घ्या (मेट्रो, बस, टॅक्सी, रेंटल गाड्या).
संबंधित देशातील प्रमुख शब्द आणि वाक्ये शिकून ठेवा. Google Translate किंवा अन्य भाषा मदत करणारे अॅप डाउनलोड करा.
आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन घ्या किंवा स्थानिक सिमकार्ड उपलब्धतेची माहिती घ्या. महत्त्वाच्या व्यक्तींना तुमच्या प्रवासाचा आराखडा सांगा.
नवीन अन्न खाण्यापूर्वी त्याचे घटक आणि शिजवण्याची पद्धत तपासा. स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी खाण्यास प्राधान्य द्या.
दूतावास किंवा कॉन्स्युलेटचा पत्ता आणि संपर्क क्रमांक ठेवा. चोरी किंवा हरवलेल्या वस्तूंसाठी स्थानिक पोलीस आणि बँकेशी संपर्क करण्याचे मार्ग माहित करुन घ्या.
प्रवासासाठी निश्चित बजेट तयार करा आणि अनावश्यक खर्च टाळा. अनपेक्षित परिस्थितीसाठी अतिरिक्त निधी ठेवा.