Pramod Yadav
डिसेंबरमध्ये गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आर्ट फेस्टिव्हल, नाताळ, सनबर्न सारखे महोत्सव गोव्यात होणारयेत.
गोव्यात डिसेंबरच्या सुरुवातीला सेरेंडिपिंटी आर्ट फेस्टिव्हल सुरु होईल. यात अनोख्या आणि कलात्मक कलाकृती पाहायला मिळतात.
गोव्यात बीचवर जाण्याचे सर्वच पर्यटकांना आकर्षण असते. उन्हाचा पारा वाढल्याने बीचवर चीलिंग खास पर्वणी असते.
डिसेंबरच्या अखेरीस असणारा नाताळ गोव्यातील एक प्रमुख सणांपैकी एक आहे. यावेळी विविध चर्चंना भेट देता येईल.
वादग्रस्त असला तरी गोव्यात डिसेंबर एन्डला होणारा सनबर्न महोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते. यासाठी हजारोंचे तिकिट घेऊन लोक हजेरी लावतात.
आणि गोव्यात सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी देखील लाखो पर्यटक हजेरी लावत असतात.
३१ डिसेंबरला राज्यातील कळंगुट - बागा, वागातोर, हणजूण, मिरामार, कोलवा यासारख्या बीचवर मोठी गर्दी पाहायला मिळते.