Pramod Yadav
बाळंतपणानंतर पहिल्यांदाच यामी गौतम या प्रसिद्ध अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली.
यामी गौतमने गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.
यामीचा आर्टीकल ३७० हा चित्रपट इफ्फीत दाखवण्यात आला, यावेळी अभिनेत्री महोत्सवात उपस्थित होती.
गोमंतकीय आदीत्य जांभळे याने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात यामी मुख्य भूमिकेत आहे.
यामीने काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिला आहे, वेदाविद असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे.
यामीने अल्पवधीत बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला तिचा आर्टीकल ३७० चित्रपट चांगलाच हिट झाला.
यामी बाळंतपणानंतर सिनेसृष्टीपासून लांब होती, दरम्यान पहिल्यांदाच ती इफ्फीत दिसून आली.